इनरव्हीलतर्फे भुसावळातील तुकाराम नगरात उद्यानाचे भूमिपूजन


भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे शहरातील तुकाराम नगर परीसरात सार्वजनिक उद्यान तयार केले जात असून त्याचे भूमिपूजन क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट रजनी सावकारे, पास्ट प्रेसिडेंट मनीषा तायडे, राखी भराडे, क्लब अध्यक्ष शीतल भराडे यांच्याहस्ते करण्यात आले. क्लबतर्फे बगीचा कंपाउंड वॉलकरीता पाचशे किलो स्टील नेट, सिमेंट पोल इत्यादी सामग्री तुकाराम नगरवासीयांना देण्यात आली. या प्रकल्पाची सुरुवात असोसिएशन सीसीसीसी डॉ.रश्मी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली होती.

मुलांसाठी खेळणे उपलब्ध करू
शीतल भराडे म्हणाल्या की, मोबाईलमुळे लहान मुलांचे लहानपण हरविले असून इनरव्हीलतर्फे सार्वजनिक बगीचे तयार करण्यात येणार असून लहान मुलांसाठी त्यात खेळणीही उपलब्ध करून देण्यात येतील. वयस्कराकरीता गप्पा गोष्टींकरीता कट्टादेखील तयार करण्यात येईल. रजनी सावकारे म्हणाल्या की, इनरव्हील क्लब आणखी भरघोस मदत करून अशा प्रकारच्या बागा तयार करतील आणि सगळीकडे हिरवळ पसरेल. या प्रकल्पाकरीता रजनी सावकारे, नयना टेकवानी, मनीषा तायडे, राखी भराडे, प्रमोद शुक्ला यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शीतल भराडे, रश्मी शर्मा, रजनी सावकारे, मनीषा तायडे, कांचन जोशी, राखी भराडे या सदस्यांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !