खंडव्यात तोतया तिकीट तपासणीसाविरुद्ध कारवाई


भुसावळ : 01062 दरभंगा-एलटीटी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात तोतया तिकीट तपासणीस असल्याची माहिती काही प्रवाशांनी गाडीतील तिकीट निरीक्षकांकडे सोमवारी केल्यानंतर त्यांनी लागलीच दखल घेत संबंधिताची विचारणा केल्यानंतर संबंधित हा तोतया तिकीट तपासणीस असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याला ताब्यात घेवून खंडवा आरपीएफकडे कायदेशीर कारवाईसाठी सोपवण्यात आले. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, दरभंगा-एलटीटी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात एक संशयीत इसम हा आपण तिकीट तपासणी असल्याचे सांगून प्रवाशांना बेकायदा रक्कम उकळत असल्याची माहिती डब्यातील सुज्ञ प्रवाशांनी तिकीट निरीक्षक संजय कुमार सिंह यांना दिल्यानंतर त्यांनी चल तिकीट निरीक्षक महेंद्र साळुंके यांना याबाबत खातरजमा करण्याच्या सूचना केल्या. साळुंके यांनी जनरल डब्यात जावून संबंधितास सखोल माहिती विचारली असता संबंधित व्यक्ती हा तोतया तिकीट तपासणीस असल्याची बाब समोर आली. संबंधित तोतया तिकीट निरीक्षकाला यावेळी खंडवा रेल्वे स्थानकावरील मुख्य तिकीट निरीक्षक (तपासणी) व रेल्वे सुरक्षा बलाकडे कायदेशीर कारवाईसाठी सोपवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !