भुसावळ डीआरएम कार्यालयातील कर्मचार्‍यांना सत्यनिष्ठेची शपथ


भुसावळ : डीआरएम कार्यालयाच्या प्रांगणात सतर्कता जागरूकता सप्ताहनिमित्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना सत्यनिष्ठेची शपथ दिली. प्रसंगी अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.सूत्र संचालन वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी केले. यशस्वीतेसाठी मंडळ दूरसंचार विभाग, इंजीनियरींग विभाग आणि कल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी सहकार्य केले. सतर्कता जागरूकता सप्ताहात निबंध आणि स्लोगन (घोषवाक्य), चित्रकला आणि वाक प्रतियोगिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या व्यतिरीक्त कर्मचार्‍यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी फील्ड स्तरावर नाशिक रोड व मनमाड येथे तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !