ईद ए मिलाद सणानिमित्त मिरवणुकीची परवानगी नाहीच
पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे : नियमांचे पालन करण्याचे आवाहन
रावेर : मुस्लिम बांधवांच्या आगामी ईद -ए – मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांची बैठक रावेर पोलिस ठाण्यात झाली. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नयेयासाठी जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक स्वरूपात गर्दी टाळण्यासाठी आदेश जारी केले आहेत. यानुसार ‘ईद ए-मिलाद’ या सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढण्याच्या सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी बैठकीत दिल्यात. बैठकीला पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस मुस्लिम बांधव, मौलाना, मुस्लिम पंच कमिटी सदस्य उपस्थित होते.

