विचव्यात बैलाची चोरी : अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा
बोदवड : तालुक्यातील विचवा येथे शेतकर्याच्या 30 हजार रुपये किंमतीचा बैल चोरून नेण्यात आल्याची घटना 26 ते 27 दरम्यान घडली. या प्रकरणी शेतकरी नारायणसिंग श्यामसिंग पाटील (44) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 17 वय असलेला, लाल व तोंडावर पांढरा रंगाचा ठिपका असलेला तसेच दोन शिंगाचा बैल चोरट्याने लांबवला. तपास हवालदार कालिचरण बिर्हाडे करीत आहेत.

