रावेर तालुक्यात 50 वर्षांपेक्षा अधिक व्यक्तीची होणार आरोग्य तपासणी


गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल : कोरोना होणार हद्दपार

रावेर : कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाला असला तरी रावेर तालुक्यातील 95 गावांमध्ये 50 वर्ष वयाच्या पुढच्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत केली जाणार आहे. ग्रामीण भागात कोरोनासदृश लक्षणे जाणवल्यास संबंधीत आरोग्य पथकाकडून तपासणी करून घेण्याचे आवाहन गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी केले आहे.
रावेर तालुक्यात कोरोना व्हायरसचा रीकव्हरी रेट चांगला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राहता कामा नये यासाठी जिल्हा व तालुका प्रशासन कमालीचे सतर्क आहे. जिल्हा प्रशासनाकडून रावेर तालुक्यातील 95 गावांमध्ये पुन्हा कोरोना व्हायसरच्या विरुध्दात अभियान चालवणार आहे. यामध्ये 50 वर्ष वयाच्या पुढच्या कमीत-कमी 200 नागरीकांची प्रत्येक गाव पातळीवर तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समिती प्रशासनाला तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले असून याची दखल घेत गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी आरोग्य प्रशासनाला नागरीकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

मास्क हीच सद्याची लस : कोतवाल
रावेर ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. प्रत्येक नागरीकांनी दीपावलीसारख्या सणामध्ये स्वत:ची काळजी घ्यावी. घराबाहेर जातांना मास्क लावायला हवा तसेच कुठेही वावरतांना फिजीकल डिस्टन्स ठेवावे व प्रशासनाच्या सूचनेचे पालन करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !