वाघोद्यात आमदारांच्या हस्ते विविध दाखल्यांसह धनादेशाचे वाटप


रावेर : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत दपाटील यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक कामाकरीता विविध प्रकारचे एकूण 600 दाखले वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांनी शिवरस्ते व पाणंदरस्तेची पाहणी करुन व अतिक्रमण रस्त्याची संदर्भात शेतकर्‍यांशी चर्चा केली तसेच मतदारसंघातील संजय गांधी विधवा कुटुंबाना अर्थसहाय्य योजनेंतर्गत 29 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजारांप्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच फेरफार अदालत, फेरफार नोंदी घेवून 7/12 उतारे वाटप करण्यात आले. कोविड महामारीत काम करणारे आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास. तहसीलदार उषाराणी देवगुणे, संगायो नायब तहसीलदार मनोज खारे, गजेंद्र शेलकर, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी प्रवीण वानखडे, तलाठी अनंता खवले, ई सेवा केंद्र चालक स्वप्नील पवार, गावातील प्रतिष्ठित शेतकरी डी.के.महाजन, किशोर पाटील, उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील, मुबारक उर्फ राजू तडवी, माजी सरपंच अनिल चौधरी, आरोग्य केंद्राचे डॉ.राणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन पाटील तर आभार अनंता खवले यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !