ऐनपूरच्या युवराज महाजन यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश


रावेर : तालुक्यातील ऐनपूर येथील युवराज विठ्ठल महाजन यांनी आम आदमी पार्टी या पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांची रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष यांनी दिले आहे.

लोकसभा क्षेत्रप्रमुखपदी नियुक्ती
तालुक्यातील ऐनपूर येथील प्रगतशील शेतकरी, रावेर कृउबाचे माजी संचालक, अ.भा.गुर्जर परीषदेचे जिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते युवराज विठ्ठल महाजन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत प्रवेश केला. पक्षानेही महाजन यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक कार्य पाहता त्यांची रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली. याबाबत नियुक्तीचे पत्र देवून जिल्हाध्यक्ष, संयोजक प्रा.तुषार निकम यांनी त्यांचा नुकताच सत्कार केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव पाटील, राणे सर, रवींद्र सोनार, योगेश वाघ, अमोल वाघ यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख या पदावर नियुक्ती झाल्यावर महाजन यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी या पक्षांची संघटन वाढविण्यावर आपला अधिक भर राहणार असून गाव तेथे शाखा यासाठी आपण सर्व मिळून आपल्या लोकसभा क्षेत्रात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !