भाजपचा आणखी विस्तार करणार : आमदार संजय सावकारे
भुसावळ : भुसावळ तालुक्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाची ताकद आगामी काळात पुन्हा वाढवून पक्षाचा आणखी विस्तार करणार आहे. एखादा कार्यकर्ता नेत्यांना चुकीचे मार्गदर्शन करतो, आकसबुद्धीने राजकारण केले जाते, मात्र नेता त्यालाच म्हटले जाते जो जात-पात न पाहता कार्यकर्ता जोडतो, असे मत यावेळी आमदार संजय सावकारे यांनी मांडले. भुसावळातील लोणारी समाज मंगल कार्यालयात भाजपा पदाधिकार्यांची गुरुवारी बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणीक, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, बेटी बचावो बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, संघटन सरचिटणीस अॅड.किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, सरचिटणीस विजय धांडे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शैलजा शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.

