अतिवृष्टीमुळे मृत्यू पावलेल्या अभंगराव कुटुंबाला कोळी महासंघाच्या वतीने आर्थिक मदत
मुक्ताईनगर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत सगळीकडे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्याचबरोबर भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचा कुंभारघाट बांधा कोसळून कोळी समाजातील अभंगराव या एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दर्वी मृत्यू झाला होता. या कुटूंबाची आमदार रमेश पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत एक लाखाची आर्थिक मदत केली.
कुटुंबाचे पुर्नवसन करण्याची केली मागणी
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी पंढरपूर येथील अभंगराव कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन घरच्यांचे सांत्वन केले व एक लाखाची आर्थिक मदत केली तसेच या कुटूंबाचे सरकारने पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई तत्काळ द्यावी व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत त्यांना घरे मिळवून द्याव, अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी सरकारकडे केली आहे. आणि निकृष्ट दर्जाची कामे करणार्या ठेकेदार व अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार रमेश पाटील, कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, कल्याण येथील उपनेते देवांनंद भोईर, उपाध्यक्ष अरुण कोळी,जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव, उपनागराध्यक्ष अनिल अभंगराव, कर्मचारी अध्यक्ष रामभाऊ कोळी, सल्लागार डी.एम.कोळी, सभापती विक्रम शिरसाठ, विक्रांत माने, पांडुरंग सावंतराव ,गणेश अंकुशराव आदींसह अनेक कोळी समाजबांधव उपस्थित होते.

