रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली अध्यक्षपदी सुनील शिरनामें

भुसावळ- रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीच्या अध्यक्षपदी सुनील शिरनामे तर सचिवपदी पवन उगले (चौहान) यांची निवड करण्यात आली. बालाजी मंदिरात झालेल्या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जीवन विमाचे सहाय्यक व्यवस्थापक अमरीश करमरकर, आईपीडीजी राजीव शर्मा, असि.गर्व्हनर चेतन पाटील उपस्थित होते. सुरुवातीला माजी अध्यक्ष डॉ.सुधीर शर्मा यानी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील शिरनामे यांनी आपल्या कार्यकाळात करण्यात येणार्या समाजोपयोगी कार्याची माहिती दिली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
रोटरेक्ट क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे नूतन अध्यक्ष सुमित यावलकर व सचिव शुभम सावरणे यांनी माजी अध्यक्ष लोकेश कांसल यांच्याकडून पदभार स्वीकारला तसेच रोटरेक्ट क्लब ऑफ नाहाटा कॉलेज नूतन अध्यक्षा शिल्पा आहूजा व सचिव डॉली दुधानी यांनी वेदश्री फालक व सचिव निशा आहुजा यांच्याकडून पदभार स्वीकारला. आभार सचिव पवन चौहान यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर सल्लागार मुकेश अग्रवाल, माधुरी गुर्जर, माधुरी पाटील, धर्मेद्र मेंडकी, तानाजी पाटील, दिनानाथ उगले, प्रमोद शुक्ला, रानी छाबडा, किरण बडेे, सुधाकर सनांसे, जीतू पाटील, विजय वानखेडे, राम पंजाबी यांनी कामकाज पाहिले.
