वेळेसह शिक्षणाचे महत्व कळण्यासाठी लघूपटाची निर्मिती

भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात चित्रीकरण
भुसावळ : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायल्यावर मनुष्य गुरगुरल्या शिवाय राहत नाही, असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची दिशा आणी दशा तो घेत असलेलं शिक्षण ठरवत असतं. त्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. एक आदर्श शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवू शकतो. हाच विषय घेऊन तरूणांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात वेळेचे आणी शिक्षणाचे महत्व सांगण्याकरीता या लघूपटाची निर्मिती करण्यात आली आहे. महाविद्यालयात भरपूर विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यांना त्यांचे शिक्षक शिक्षणासोबत बाळकडू ही देत असतात, फक्त एखाद्यालाच ते समजतं आणी पचतं. लघूपटातील पात्र अजयच्या आयुष्यातही असाच काहीतरी बदल घडतो. पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमात नाट्यशास्त्र विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगातून पु.ओ.नाहाटा नाट्यशास्त्र विभाग व ड्रामा लॅब फिल्म्स प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रीकरण करण्यात आले आहे.
यांचे लाभले सहकार्य
टर्निंग पॉईंंटचे छायांकन तन्मय रासकर (पुणे), संवाद, पटकथा लेखन आणी दिग्दर्शन अतुल दिलीपसिंग चौधरी, सहाय्यक दिग्दर्शक प्रणव भिसे (पुणे), साऊंड रेकॉर्डिंग गौरव शर्मा, लाईट्स बोधीसागर तायडे, अभिर एरखे, लोकेशन व्यवस्थापन कुंदन तावडे, कलाकार समन्वयक उमेश गोर्धे, सतीश कुलकर्णी, वैभव मावळे, अभिजीत ओक यांचे मार्गदर्शन आहे. संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णु चौधरी व प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात लघुपटाच्या चित्रीकरणाची परवानगी दिली. अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, रचना महाजन, आशिष चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
यांनी वठवली भूमिका
वैष्णवी दयानंद पाटील, शुभम झोपे, आम्रपाली मेढे, बुद्धभुषण अहिरे, स्वप्नील ननावरे, सोनल पगारे, मयुरी भोंदे, ऐश्वर्या वासकर, वैष्णवी चौधरी, पल्लवी सोनार, पंकज कोळी, लीना नारखेडे यांनी विद्यार्थ्यांची भूमिका केली. अतुल दिलीपसिंग चौधरी हा नाट्यशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी असून त्याने महाविद्यालयात असतांना अनेक नाटक व एकांकिकांमध्ये भूमिका केली आहे.आता तो चित्रपट निर्मितीकडे वळला असून लवकरच आपल्याला ‘टर्निंग पॉईंट’ हा लघूपट त्याच्या ‘ड्रामा लॅब फिल्म्स’ या युट्युब चॅनेलवर बघायला मिळणार आहे. या आधी त्याने ‘अमीगो’ ह्या लघूपटातून समाजात जनजागृती केली होती.




