जोगलखोरी जिल्हा परीषद शाळेला वॉल कम्पाऊंडने दिलासा


शिक्षणामुळे जीवनात साधता येते प्रगती -आमदार संजय सावकारे

भुसावळ- शिक्षण हा विकासाचा पाया आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांचा विकास करा, शिक्षणामुळे जीवनात यश, आनंद, समाधान व प्रगती साधता येते, असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी ग्रामस्थ व पालकांशी संवाद साधतांना तालुक्यातील जोगलखोरी येथे केले. जिल्हा परीषद प्राथमिक शाळेला तार जाळीचे कम्पाऊंड लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
सर्वप्रथम महिलांनी प्रवेशद्वाराजवळ आमदार संजय सावकारे व रजनी सावकारे यांचे औक्षण केले. कार्यक्रमास वराडसीमच्या सरपंच गीता खाचणे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मावळे, शालेय समिती अध्यक्ष मंगलसिंग बागडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोळी, मंगेश कोळी, कुर्‍हा ग्रामपंचायतचे सदस्य नारायण कोळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना महाजन यांनी केले. आमदार संजय सावकारे यांनी स्वखर्चाने शालेय आवार तार जाळी कंपाउंड करून दिल्यामुळे त्यांचा शालेय समिती अध्यक्षांनी सत्कार केला. यावेळी आमदार सावकारे ,निवृत्ती मावळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.
कार्यक्रमानंतर शालेय आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी अमोल चौधरी, काशिनाथ पाटील, भास्कर चौधरी, गजानन पाटील, अनिल पाटील, आशा पाटील, अर्चना महाजन यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.