मुकटी हादरले : सख्या भावाची चाकूने वार करीत हत्या


धुळे : सख्खा भाऊ पक्का वैरी म्हण खरी ठरल्याचा प्रत्यय तालुक्यातील मुकटी येथे आला. सांडपाण्याचा वद विकोपाला गेल्यानंतर भावानेच चाकूचे सपासप वार करीत भावाची हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. धनराज दौलत पाटील यांचा या घटनेत मृत्यू झाला तर त्यांचा भाऊ दादा दौलत पाटील (25, रा़ लक्ष्मीनगर, मुकटी, ता़ धुळे) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

भांडणातून चाकूहल्ला
मुकटी येथे सांडपाण्यावरुन सुरेश भिला पाटील आणि दादा दौलत पाटील रविवारी सकाळी जोरदार वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी सायंकाळी भैय्या दौलत पाटील आणि काही जण एकत्र आले़ त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत विकोपाला जाणारा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता वावद अधिकच वाढल्याने तणाव निर्माण झाला. संशयीत दादा दौलत पाटील (25, रा़ लक्ष्मीनगर, मुकटी, ता़ धुळे) याने चाकू हल्ला केल्याने त्यांचा भाऊ धनराज दौलत पाटील यांच्या छातीवर चाकू लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर भैय्या दौलत पाटील व रवींद्र धनराज पाटील यांना दुखापत झाली़
याप्रकरणी भैय्या दौलत पाटील (34, रा़ लक्ष्मीनगर, मुकटी, ता़ धुळे) यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी दादा दौलत पाटील (25, रा़ लक्ष्मीनगर, मुकटी ता़ धुळे) याच्या विरोधात भादंवि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास सोमवारी पहाटे अटक करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !