भुसावळात जय गणेश फाऊंडेशन तर्फे रंगले बालकीर्तनकारांचे किर्तन

भुसावळ- शहरातील जय गणेश फाऊंडेशन नवसाचा गणपतीतर्फे गणेशोत्सव निमित्त बाल कीर्तनकार ह.भ.प.मोहिते महाराज पाटील उटखेडेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. ‘गो कथा व शिवचरीत्र’ या विषयावर प्रबोधन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यात आले. शहरातील बहुसंख्य नागरीक, आबालवृद्ध हजर होते. या प्रसंगी बंदोबस्तासाठी हजर असलेल्या पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली. जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, अध्यक्ष धीरज धांडे, सचिव तुषार झांबरे, उपाध्यक्ष दिनेश शर्मा, संतोष भंगाळे तसेच पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.
आज शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम
गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त ’सद्गुरु तम् नमामि’ या शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त शिक्षकांचा गौरव करण्यात येईल. धरणगाव येथील साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे तसेच चाळीसगाव येथील कवी मनोहर आंधळे यांचा ‘शिक्षण पद्धती’ वर परीसंवाद होईल. शहरातील शिक्षकांना उपस्थितीचे आवाहन जय गणेश फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
