जळगाव तुरुंगाधिकार्‍यांना मारहाण : न्यायालयात अहवाल रवाना


जळगाव : कैद्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तुरुंगाधिकारी किरण संतोष पवार यांच्यावर सचिन सैंदाणे या कैद्याने लोखंडी पट्टीने वार केल्याची घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजता जिल्हा कारागृहात घडल्यानंतर दोन्ही संशयितांमध्ये पैशांच्या वादातून मारहाण झाल्याचे उघड झाले होते. कारागृह अधीक्षक ए. आर. वांढेकर यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल न्यायालयास सादर केला असून याबाबत पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.