रावेरात पोलिसांच्या रूट मार्चने गुन्हेगारांच्या उरात धडकी
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गावर पोलिसांचे पथसंचलन
रावेर : गणेशोत्सव, मोहरम व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे शहरासह तालुक्यातील रसलपूर गावातील विविध भागातून सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. सशस्त्र पोलिसांच्या पथसंचलनाने गुन्हेगारांच्या उरात धडकी भरली असून सर्वसामान्य नागरीकांनी मात्र समाधान व्यक्त केले.
रावेरासह रसलपुरात पथसंचलन
रावेर शहरासह रसलपूर गावात गणेशोत्सव व मोहरम सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल व रॅपीड अॅक्शन फोर्सच्या जवानांने सशस्त्र पथसंचलन केले.
रावेर पोलिस ठाण्यांतर्गत शहर व परीसरात कायदा व सुव्यवस्था कायदा व अबाधीत रहावी यासाठी गुरुवारी सकाळी पथसंचलन करण्यात आले.
पथसंचलनात या अधिकार्यांचा सहभाग
जिल्ह्याच्या अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के, उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम, मनोज वाघमारे यांच्यासह पोलिस, रॅपीड अॅक्शन फोर्ससह, गृहरक्षक दलाच्या जवानांनी पोलि ठाण्यापासून आंबेडकर चौक, मेन रोड, चावडी भाग, नागझिरी भाग, स्वामी विवेकानंद चौक, शिवाजी चौक, भोई वाडा, गांधी चौक अंबिका व्यायाम शाळा आदी शहरातील प्रुमुख मार्गावरून पथसंचलन केले. रसलपूर येथेही पथसंचलन करण्यात आले.