जळगावच्या दादावाडीतील तरुणाची आत्महत्या
जळगाव- जळगावच्या दादावाडी भागातील श्रीराम नगरातील 35 वर्षीय तरुणाने घरात कुटुंब झोपले असताना आत्महत्या केली. रीतेश रवींद्र कदम असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी समोर आली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. श्रीराम नगरात रीतेश हा वडील, आई मंदा, लहान भाऊ दिपेश, वहिनी भारती या कुटुंबियांसह राहत होता. रीतेशचे वडील रवींद्र बाबुराव कदम हे परीवहन महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. गुरुवारी रीतेशने दरवाजा न उघडल्याने खडकीतून डोकावून पाहिले असता आत्महत्या केल्याचे लक्षात आले. तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्येची नोंद करण्यात आली.