खंडोबा देवस्थान गादिपतींना संत संमेलनात ‘राष्ट्रीय संतपदाची पदवी’


निवड झाल्याने श्रीराम कथेप्रसंगी फैजपूरात सत्कार

फैजपूर- खंडोबा देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांची राष्ट्रीय संतपदी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमा व ब्रम्हलीन घनश्यामदास महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त खंडोबा देवस्थानात श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. संत संमेलनात दिगंबर अनी आखाडा, नाशिकचे अध्यक्ष रामकिशोर शास्त्री यांनी महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांना राष्ट्रीय संत ही पदवी दिली. महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांचे कार्य भारतभर आहे. चारही कुंभमेळाव्यात आलेले भक्त गण यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवपुरी, फैजपूर येथील देवस्थानातून साधू, संत, महंत खाली हात परत जात नाही. हा भक्तिभाव कार्याची जाणीव लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रीय संत ही उपाधी देण्यात आली. ही फैजपूरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. खंडोबा देवस्थानात दररोज सकाळ संध्याकाळ पूजा, आरती धार्मिक कार्यक्रम होत आहे. मंदिराचे वातावरण भक्तिमय झाले असून भक्तांचा ओघ वाढत आहे.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रीय संत उपाधीबद्दल फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी राष्ट्रीय संत पुरुषोत्तम दास महाराज यांचा बुके देउन सन्मान केला. यावेळी सप्तश्रुंगी वणी गड चे महंत विष्णुदास महाराज, धर्माबादचे शिवमदास महाराज, राममनोहरदास, पवन यादव, सुरेश परदेशी, गोविंदा गलवाडे, अरुण होले, गणेश गलवाडे, नंदू अग्रवाल, चंदू कोळी, चंद्रकांत भिरूड, चोलदास पाटील, सुनील कोळी, संदीप राणे, राहुल साळी, रवींद्र भारंबे, गोविंदा नारखेडे, बाळू नारखेडे, धनराज नारखेडे, पंडित राणे आदींची उपस्थिती होती.

लवकरच भक्तीनिवासाचे होणार काम
फैजपूर येथील खंडोबा देवस्थानात येणारे संत-महंतांची अन्न, वस्त्र, निवार्‍याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. माझ्या कार्यकाळात कुणीही संत महंत खाली हात परत जाऊ नये यासाठी लवकरच भक्त निवासाचे काम सुरू करण्यात येईल व व आपल्याला राष्ट्रीय संत ही उपाधी संत संमेलनात दिल्याने सर्व संत-महंतांचा ऋणी असल्याचे राष्ट्रीय संत गादीपती पुरुषोत्तमदास महाराज म्हणाले.


कॉपी करू नका.