p>

‘पतंजली’ फेक वेबसाईट फसवणूक प्रकरण : बिहारातील आरोपीला 9 पर्यंत पोलिस कोठडी


जळगाव : पतंजली एजन्सीची बनावट (फेक) वेबसाईट बनवून जळगावसह राज्यातील अनेकांना लाखोंचा गंडा घालणार्‍या बिहारमधील नितीशकुमार नवलकिशोर प्रसाद (28, बिहारशक्ती, नांलदा, बिहार) या महाठगाच्या जळगाव सायबर सेलच्या पथकाने मुसक्या मंगळवारी मुसक्या आवळल्या होत्या. गुरुवारी पथक जळगावात पोहोचल्यानंतर आरोपीस जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यास 9 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. भुसावळातील एकाला पतंजलीची एजन्सी व वस्तू देण्याच्या नावाखाली साडेतीन लाखात गंडवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली.

भुसावळातील एकाला साडेतीन लाखात गंडवले
भुसावळातील रहिवासी सागर बत्रा यांची पतंजलीची फेक वेबसाईट बनवून आरोपीसह तिघांनी साडेतीन लाखात फसवणूक केली होती. यापूर्वी सायबर सेलच्या तपासात आरोपी अजयकुमार व सुमनकुमार (पटना, बिहार) यांनी फेक वेबसाईट बनवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती तर महाठग मात्र पसार होता. दोन वेळा पथक गेल्यानंतरही आरोपी हाती लागत नव्हता मात्र खबर्‍याच्या गोपनीय माहितीवरून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

आरोपीला सुनावणी 9 पर्यंत पोलिस कोठडी
आरोपी नितीशकुमारला गुरुवारी जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास 9 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आरोपीच्या भावाचादेखील सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तपास जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव सायबर सेलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक अंगद नेमाणे करीत आहेत.


कॉपी करू नका.