कोंडाईबारी घाटात भीषण अपघात : तीन जागीच ठार


 

विसरवाडभ ः राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाबारी घाटात भरधाव ट्रकने स्वीप्ट कारला धडक दिल्याने वाहन 30 फूट पुलावरील खाली कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक बालिका जखमी झाली. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

भरधाव ट्रकनी स्वीप्टने उडवले
सूत्रांच्या माहितीनुसार, धुळ्याकडून सुरतकडे जाणार्‍या ट्रकने राजकोटहुन साक्री येथे जाणार्‍या चारचाकीला धडक दिल्याने स्वीप्ट कार थेट 30 फूट पुलावरून खाली कोसळल्याने तिघे ठार झाले. गोरख सोनू सरख (45, रा.महिर, ता.साक्री), प्रफुल सुरेश वाघमोडे (35), मनीषा प्रफुल वाघमोडे (21, दोन्ही रा.राजकोट, गुजरात) अशी मयतांची नावे आहेत तर निकिता गोरख सरख (15) ही बालिका जखमी झाली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारा ट्रक चालकाने ट्रकसह अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. विसरवाडी पोलिस आणि ग्रामस्थांनी अपघाताच्या ठिकाणी मदतकार्य करून जखमींना बाहेर काढले असून त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !