एरंडोल शहरातील युवकाने गळफास घेत संपवले जीवन


एरंडोल – शहरातील मारोती मंढी परीसरातील तुषार रामदास महाजन (वय 26) या युवकाने राहत्या घरतील स्वयंपाक खोलीत असलेल्या आसारिला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्ये करण्यामागील कारणांचा अद्याप उलगडा झालेला नाही. मयत तुषारच्या पश्चात वडील, पत्नी, दोन बहिणी व एक मुलगा असा परीवार आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अनिल पाटील, निसार पटेल, प्रदीप चांदोलकर करीत आहे.


कॉपी करू नका.