जम्मू-काश्मिरातील ऐतिहासीक निर्णयानंतर भुसावळात भाजपाचा भर पावसातही जल्लोष


ढोल-ताशांच्या गजरात आमदारही थिरकले ; नागरीकांना लाडूचे वाटप

भुसावळ- कलम 370 रद्द झाल्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी केंद्र सरकारने घेतल्यानंतर भुसावळातील भाजपा पदाधिकार्‍यांनी जामनेर रोडवरील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर भर पावसातही ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आमदार संजय साावकारेदेखील वाद्यावर थिरकले. यावेळी उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर नगरसेवक निर्मल कोठारी यांनी तिरंगा ध्वज हाती घेत नृत्य करीत उपस्थितांचे लक्ष वेधले.

यांची होती उपस्थिती
यावेळी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, आमदार संजय सावकारे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे आदींनी आतषबाजी केली. मिठाई वाटप करुन निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक निर्मल कोठारी, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, निक्की बतरा, वसंत पाटील, परिक्षीत बर्‍हाटे, देवेंद्र वाणी, गिरीश महाजन, दिनेश नेमाडे, सुमीत बर्‍हाटे, राजेंद्र नाटकर, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, नारायण रणधीर, सुरेश कुटे, खुशाल जोशी, मुकुंदा निमसे, बापू महाजन, किशोर पाटील, शेखर इंगळे, अनिरुद्ध कुलकर्णी, रवी ढगे, प्रशांत देवकर, सतीश सपकाळे, गौरव आवटे उपस्थित होते.


कॉपी करू नका.