मुंबईत पाऊस : आज डाऊन छपरा व अप महानगरी रद्द

रेल्वे प्रवाशांची गैरसोय : अनेक गाड्या धावताय विलंबाने
भुसावळ : मुंबईतील पावसाने मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून दररोज रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. शुक्रवारी 15102 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल्स छपरा एक्सप्रेस व अप वाराणसी मुंबई-महानगरी एक्सप्रेस प्रारंभिक स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे.
