वरणगावच्या विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ : पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा


भुसावळ- माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने वरणगावातील माहेर व भुसावळातील सासर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरणगावच्या अक्सा नगरातील खिडकीवाडा येथील रहिवासी फरजाना बी शेख युनूस यांच्या तक्रारीनुसार सासरच्यांनी पतीच्या व्यवसायासाठी दोन लाख रुपये न आणल्याने 12 फेब्रवारी 2004 ते 7 जून 2019 या काळात छळ केला. या प्रकरणी पती शेख युनूस शेख साबीर, सासू शमा बी शेख शब्बीर, शेख समीर शेख शब्बीर, दिराणी मरजीना शेख समीर, दिर शाहरूख शेख शब्बीर, दिराणी रेशमा शेख शाहरूख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.