शिरपूरच्या बेपत्ता युवकाचा तापी पात्रात आढळला मृतदेह


शिरपूर : शहरातील वाल्मिक नगरातील 18 वर्षीय युवकाचा  सावळदे गावाजवळ तापी नदीच्या पात्रात मृतदेह तरंगताना शुक्रवारी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सागर युवराज कोळी (18, रा.वालमिक नगर, शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळपासून घरात कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेला होता. नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू असतानाच तरुणाची सायकल तापी नदी पुलावर उभी असल्याची आढळून आल्याने नदी पात्रात शोध त्याचा सुरू केला असता शुक्रवारी सकाळी सदर तरुणाचा मृतदेह नदी पात्रात पाण्यावर तरंगताना आढळला. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. वॉर्डबॉय प्रवीण पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !