चाळीसगावात सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाचा निषेध
चाळीसगाव : गड, किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर सरकारवर टिकेची झोड उठत असून या निर्णयाविरोधात शहरातील सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे चाळीसगावातील सिग्नल पॉईंटवर शुक्रवारी सायंकाळी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला.