कमरावदच्या पाझर तलावात बुडाल्याने सहा बालकांचा मृत्यू


शहादा तालुक्यातील दुर्दैवी घटना : तीन बालके बचावली

शहादा : पाचव्या दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यासाठी तलावावर गेलेल्यांपैकी एक बालक बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी आठ अन्य बालके तलावाच्या पाण्यात उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सहा बालकांचा बुडाल्याने करुण अंत झाल्याची घटना शहादा तालुक्यातील कमरावद येथील तलावात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या घडली. मयत बालके ही वडछील येथील रहिवासी असून अवघ्या 17 ते 20 वयोगटातील आहेत. या घटनेने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, तीन बालके सुदैवाने या घटनेत बचावली आहेत.

 

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लीक करा-

https://www.youtube.com/watch?v=2tCf6Z9aFFc&feature=youtu.be

या तरुणांचा बुडाल्याने करुण अंत
मृतांमध्ये सचिन सुरेश चित्रकथे (19), दीपक सुरेश चित्रकथे (21), विशाल मंगल चित्रकथे (17), रवींद्र शंकर चित्रकथे (21), कैलास संजय चित्रकथे (17), सागर आप्पा चित्रकथे (20) अशी मृतांची नावे आहेत. मृतांपैकी चौघे अविवाहित असून दोघे विवाहित आहेत. दीपक चित्रकथे यांचे लग्न झाले असून रवींद्र चित्रकथे यांना दोन मुले आहेत.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
या दुर्दैवी घटनेची माहिती कळताच प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

(सविस्तर वृत्तासाठी बातमी रीफ्रेश करत रहा)


कॉपी करू नका.