भुसावळात भरधाव डंपरच्या धडकेत बुलढाण्याचे दाम्पत्य ठार


लग्नासाठी आले होते दाम्पत्य : डोक्यावरून गेले डंपरचे चाक

भुसावळ : लग्नासाठी भुसावळात आलेल्या बुलढाण्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने कट मारून झालेल्या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता खडका चौफुलीवर हा अपघात झाला. या अपघातात चंद्रकांत जगन्नाथ वराडे (63) व संध्या चंद्रकांत वराडे (56) यांचा मृत्यू झाला.

डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू
बुलढाण्यातील वराडे दाम्पत्य भुसावळातील गडकरी नगरात नातेवाईकांकडील लग्न समारंभासाठी आले होते. गुरुवारी भुसावळातील देना नगरातील नातेवाईकांकडे मुक्काम केल्यानंतर दाम्पत्य दुचाकी (एम.एच.28 ए.एल.6671) ने खडका रोडने गडकरी नगराकडे येण्यासाठी निघाले असता खडका चौफुलीवर एका डंपरने कट मारून दुचाकी घसरली व दाम्पत्यही रस्त्यावर फेकले गेल्यानंतर दाम्पत्याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच पोलिस उपअधीक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्‍यांनी घटनास्थही धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !