राष्ट्रवादीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी सतीश घुले यांची निवड

भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी सतीश भिका घुले यांची निवड करण्यात आली. शुक्रवारी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शेतकी संघ सभापती पंढरी पाटील, गजानन सरोदे, जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, साजीद शेख, सिकंदर खान, सलीम पिंजारी, राहुल बोरसे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
