मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर धरणे काँग्रेसचे आंदोलन
दिल्लीच्या शेतकर्यांच्या आंदोलनाला दिला जाहीर पाठिंबा
मुक्ताईनगर : केंद्र सरकारने कृषी व शेतकरी संदर्भात पारीत केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शने व आंदोलन करीत आहे. या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकर्यांनी मोठे आंदोलन उभे केले असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मुक्ताईनगर तहसीलबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष एस.ए.भोई, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन खुरपडे, जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, आसीफ खान, मागासवर्गीय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, शिवसेना जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अफसर खान, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत टोणगे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नीरज बोराखडे, मुक्ताईनगर नगरपंचायतीचे गटनेते राजेंद्र हिवराळे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील, शरद महाजन, सुभाष पाटील, नामदेव भोई, सोनू सिंग पवार, अशोक पाटील, संजय धामोडे, तालुका उपाध्यक्ष दिनकर भालेराव, रोहित भालेराव, अनिल सोनवणे, पू.स.धायले, राजू शर्मा, दीपक वाघ, प्रकाश पाटील, निखील चौधरी, राजू जाधव, निलेश पाटील, नितीन पाटील, मोसीन शेख, सलीम मंत्री, बाबू पटेल, युनुस शेख, बाजीराव कोळी, मोहन खुळे, सलीम खान, रशीद खान, अॅड.कुणाल गवई तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

