भुसावळ डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे स्वागत


भुसावळ : भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे जिल्ह्यातील शिक्षक मित्रांतर्फे स्वागत करण्यात आले. शिर्डी येथून बदली होऊन आलेले सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ येथील डीवायएसपी पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. 2011 मध्ये प्रशिक्षण घेऊन 2015 ते 2017 दरम्यान नागपूर येथील एसीबी क्राईममध्ये त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर डीवायएसपी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. गेल्यावर्षी शिर्डी येथील डीवायएसपी पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता. तेथून त्यांची बदली भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारीपदी झाली. त्याबद्दल त्यांचे जळगाव जिल्ह्यातील शिक्षक मित्रांतर्फे स्वागत करण्यात आले. जळगाव येथील राहुल चौधरी व मनोज खडके आणि भुसावळ येथील डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लेखन व वाचनाची आवड असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !