वढोदाजवळील अपघात प्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा
यावल : चोपडा रस्त्यावरील वढोदा गावाजवळ दुचाकी (एम.एच. 19 बी. आर. 8554) वरून भीमसिंग पंडीत पाटील (रा.विरावली) हे येत असताना चारचाकी (एम.एच.03 बी.ई.5279) ने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात भीमसिंग पाटील हे जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी कार चालक डॉ.सागर कडू वारके यांच्याविरूध्द हवालदार महेबुब तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेबूब तडवी करीत आहेत.

