डांभूर्णीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग


यावल : अल्पवयीन तरुणीचा सातत्याने पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी डांभूर्णीच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन तरुणीवर प्रेम असल्याचे सांगत संशयीत मुलाने आत्महत्येचादेखील प्रयत्न केल्याची माहिती आहे. डांभूर्णी, ता.यावल येथील रहिवासी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या आठवड्याभरापासून गावातील एक अल्पवयीन मुलाने तिचा पाठलाग करीत प्रेम करीत असत्याची बतावणी केली शिवाय स्वतःच्या हातावर ब्लेडही मारले. पीडितेने कुटुंबीयास हा प्रकार सांगितल्यानंतर तिला नातेवाईकांकडे पाठवले मात्र तेथेदेखील अल्पवयीन संशयीत पोहोचल्यानंतर पीडीतेने कुटुंबांना हा प्रकार सांगितल्यानंतर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !