गेंड्याची कातडी पांघरुन बैठकीला येऊ नका, उत्तरे द्या


रावेर पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सभापती संतापले

रावेर : रावेर पंचायत समितीच्या मासिक बैठकीत विकास कामांच्या मुद्यावरुन पुनर्वसन विभाग माहिती देत नसल्याने पंचायत सभापती जितु पाटील चांगलेच संतापले. गेंड्याची कातडी पांघरुन पंचायत समितीच्या मासिक बैठकीला येऊ नका, उत्तरे द्या परंतु पुनर्वसन विभागाचे अधिकारी निरूत्तर राहिले. त्यांना त्यांच्याच विभागाने केलेल्या विकास कामांची माहिती देता आली नाही. शुक्रवारी रावेर पंचायत समितीची मासिक बैठक झाली.

पुर्नवसन विभागाचे अधिकारी निरूत्तर
पुर्नवसन विभागाचे साहाय्यक अभियंता पी.एस.इंगळे यांना पुर्नवसन संबंधीत सभापती यांनी प्रश्न विचारले असता इंगळे यांना एकाही प्रश्नाची उत्तरे देता आले नाही. अशीच अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याची उडाली. तालुक्यातील रस्ते व विविध विकास कामांच्या प्रश्नावरुन सभापती पाटील चांगलेच संतापले. या बैठकीला पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, प्रतिभा बोरवले, योगीता वानखेडे, कविता कोळी, धनश्री सावळे, माधुरी नेमाडे, अनिता चौधरी उपस्थित होत्या. बैठकीचे कामकाज गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी पाहिले.

यांची होती उपस्थिती
मासिक बैठकीला कृषी विभाग, जि.प.बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिकबाल विकास प्रकल्प विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती बांधकाम विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !