मांडळ शिवारात पोलिस असल्याचे भासवून वृद्धाला दिड लाखात गंडवले
शिरपूर : पोलिस असल्याचे भासवत मांडळ शिवारातून जात असलेल्या वयोवृद्धाकडील एक लाख 43 हजार रुपये किंमतीचा ऐवज दोघा भामट्यांनी लांबवल्याची घटना 6 रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. कळमसरे रस्त्यावरील हॉटेल साहेबासमोरून जात असलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप बभूतराव भैरव (69, रा.प्लॉट नंबर 40, महालक्ष्मी कॉलनी) हे दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास मांडळ शिवारात रीद्धीसिद्धी कॉलनीत आपला प्लॉट बघण्यासाठी जात असताना दुचाकीवरून दोन संशयीत आले व त्यातील एकाने आपण उपनिरीक्षक असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले. मोकळ्या जागेवर सोने घालून आपण फिरत असून शहरात चोरटे फिरत असल्याने आपल्यासाठी ही बाब धोकेदायक असल्याने अंगावरील दागिने रूमालात बांधून आमच्याकडे द्या, असे सांगताच वृद्धाने गळ्यातील 80 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याची चैन, हातातील 28 हजार रुपये किमतीची 7 ग्रॅम वाजनाची अंगठी व टायटन कंपनीची घड्याळ हात रुमालात ठेवताच आरोपींनी रूमालाचे गाठोडे अलगद लांबवत धूम ठोकली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

