शिरपूर भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापक एसीबीच्या जाळयात


11 हजारांची लाच भोवली : धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

धुळे : वडिलोपार्जित घरावर तक्रारदार असलेल्या वारसदाराचे नाव लावण्यासाठी 11 हजारांची लाच मागणार्‍या शिरपूर भूमिअभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापक राजू छगन पवार यास 11 हजारांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताच कार्यालयात अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, निरीक्षक प्रकाश झोडगे, हवालदार जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडिले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम, भूषण शेटे, सुधीर मोरे आदींनी हा सापळा यशस्वी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !