निंभोर्यात गोळीबार : चार जण जखमी
रस्त्यातील दुचाकी हटवण्याच्या कारणावरून वाद : जखमींवर गोदावरीत उपचार
भुसावळ : रस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घ्या, असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी तिघांना शिवीगाळ व चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थास मारहाण करण्यात येवून आरोपींनी हवेत पिस्टलमधून दोन फैरी झाडल्याने निंभोरा गावात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाले असून जखमी चौघांवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभारे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी तालुका पोलिसात समाधान भिका साळुंखे (बुद्ध विहारामागे, निंभोरा) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी कुणाल अहिरे उर्फ डायमंड पूर्ण नाव माहित नाही (झेडटीएस) व आरोपी सोबतच्या सहा ते सात संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या मारहाणीत फिर्यादी समाधान साळुंखे (निंभोरा), शेख हुसेन शेख चाँद (31, निंभोरा), लखविंदरसिंग जसविंदरसिंग सनसोय (25, निंभोरा), शरीफ शहा जैनोद्दीन शहा (21) हे जमखी झाले. दरम्यान, शुक्रवार, 6 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास निंभोरा बु.॥ गावातील हॉटेल त्रिमूर्तीजवळ ही घटना घडली.