जळगावात घरफोडी : चार लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
जळगाव : शहरातील शिवाजी नगर भागातील मकरा पार्क अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी पुन्हा पोलिसांची गस्त भेदून चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत चार लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांसह रोकड लांबवली.
वाढत्या घरफोड्यांनी घबराट
शिवाजी नगरातील मकरा पार्क अपार्टमेंटच्या जी विंग मधील 125 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये खुर्शिद हुसेन मजहर अली (80) हे पत्नी फिजासह राहतात. घरासमोरील बिहरा प्रार्थनास्थळात कार्यक्रमासाठी दाम्पत्य शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडले. दुपारी हे दाम्पत्य घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढहले. कपाटातील चार लाखांचे सोन्याचे दागिणे व चार हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याने त्यांनी पोलिसांना माहिती कळवताच शहर पोलिसांनी धाव घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात घरफोडीचे सत्र सुरु असल्याने नागरीरकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.