रावेरसह सावदा, फैजपूरातील धान्य व्यापार्यांची पूरग्रस्तांना मदत
रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे सोपवला मदतीचा धनादेश
रावेर- सांगलीसह कोल्हापूर परीसरात आलेल्या महापुरात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होवून तेथील जनजीवन पूर्णपणे विसकळीत झाले. कित्येकांचे संसार आजही उघड्यावर पडल्याने जनजीवन पूर्व पदावर येण्यासाठी शासनाने शासकीय मदत करीत तेथील नागरीकांना दिलासा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर रावेरसह सावदा, तथा फैजपूर येथील धान्य व्यापार्यांनी आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून सांगलीसह कोल्हापूरसह परीसरात महापुराने बाधीत झालेल्या नागरीकांना एक लाख 43 हजार 950 रुपयांची आर्थिक दिली.
तहसीलदारांकडे सोपवला मदतीचा धनादेश
शनिवार, 7 रोजी व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल पुनचंद अग्रवाल, अनिल बबनशेठ अग्रवाल, श्रीरामशेठ अग्रवाल, किरण नेमाडे, किशोर गुजराती (फैजपूर), योगेश पाटील, विशाल वाणी (फैजपूर), बाबूलाल पाटील, यश अग्रवाल, विलास चौधरी, दिलीप अग्रवाल, कैलास पाटील, अनिल चौधरी, विलास कपले, शिवराम कपले, विकास पाटील आदी धान्य व्यापार्यांनी एक लाख 43 हजार 950 रुपयांचा धनादेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी नामदार हरीभाऊ जावळे, नियोजन समिती सदस्य पद्माकर महाजन, माजी शिक्षण समिती सभापती सुरेश धनके भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, पंचायत समिती गटनेते पी.के.महाजन, मनोज श्रावक, दिलीप पाटील, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, नगरसेवक यशवंत दलाल आदी उपस्थित होते.