सिल्लोडच्या दोघा तरुणांचा के.टी.बंधार्यात बुडाल्याने मृत्यू
एकास वाचवण्यात यश : नातेवाईकांकडे आल्यानंतर दुर्दैवी घटना
पाचोरा : सिल्लोड येथील तरुण नातेवाईकांकड आल्यानंतर त्यांना पोहण्याचा मोह झाला मात्र के.टी.वेअरच्या बंधार्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला तर एकास वाचवण्यात यश आले. पाचोरा तालुक्यातील निमखेडी शिवारातील केटी वेअर बंधार्यात ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. संदीप तात्याराव चव्हाण (18) व निलेश चव्हाण (21) असे मृत तरुणांची नावे असून या घटनेत अमर चव्हाण हा तरुण सुदैवाने बचावला आहे. मयत दोघे तरुण सिल्लोड गावातील रहिवासी असून शिंदाड येथे आप्तस्वकीयांकडे आल्यानंतर त्यांना दुपारी पोहण्याचा मोह झाल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. येथील रहिवासी असून शिंदाड येथे नातेवाईकांकडे आले होते. गावापासून काही अंतरावर असलेल्या के.टी.वेअरमध्ये पोहताना अचानक खोलगट भागातून निघता न आल्याने या तरुणांचा मृत्यू झाला.