निंभोरा गोळीबार प्रकरण : दोघा आरोपींना अटक
भुसावळ : रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणार्या दुचाकी बाजूला घ्याव्यात, असे सांगितल्याचा राग आल्याने तालुक्यातील निंभोरा बुद्रूक गावातील हॉटेल त्रिमूर्तीजवळ चौघांना मारहाण करून हवेत पिस्टलातून दोन फैरी झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर संशयीत आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले होते मात्र पोलिसांच्या विविध पथकाद्वारे त्यांचा कसून शोध सुरू होता. रविवारी पहाटे कुणाल अहिरे उर्फ डायमंड व अन्य दुसरा त्याचा साथीदार सुनील गोपाळ उमरीया (27, रा. पीओएच कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.