बोदवडमध्ये ‘संदल’ मिरवणुकीने मोहरम उत्सवाला सुरुवात


हिंदू बांधवांच्या सर्वाधिक सवार्‍या : सवार्‍या पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक दाखल : नवस फेडण्यासाठीही गर्दी

बोदवड : हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडवणार्‍या मोहर्रम पर्वास संदल मिरवणुकीने येथे शनिवारपासून उत्साहात सुरूवात झाली. मोहरमच्या सात तारखेला (छडी) सवार्‍या बसवण्याची परंपरा बोदवड शहरात असून सलग चार दिवस चालणार्‍या या उत्सवात 7 रोजी शहरात सर्वत्र ठिकठिकाणी मनोभावे सवार्‍या बसवण्यात आल्यानंतर रात्री मिरवणूक काढण्यात आली. बोदवड शहरातील सवार्‍या पाहण्यासाठी राज्यभरातून शेकडोच्ंया संख्येने भाविक शहरात दाखल झाले आहेत. बोदवडमध्ये सुमारे अडीचशे सवर्‍या दरवर्षी बसवल्या जातात. त्यात सर्वाधिक 140 हिंदूच्या तर 110 मुस्लिम बांधवांच्या सवार्‍या बसवण्यात आल्या.

उत्सव यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
मोहरम उत्सव साजरा करण्यासाठी सलाम भगत, भास्कर भगत, गुना भगत, नाना भगत, मनोहर भगत, गोपाल भगत, गुरुजी भगत, सुभाष भगत, गुड्डू भगत, सुरेश भगत, गजू भगत, ईश्वर भगत, सुनील भगत, अर्जुन भगत, पप्पू भगत, नयम भगत, सुभान भगत, ताहेर भगत, सलाम भगत, युवराज भगत, मोंटी भगत, बंटी भगत, सुभान भगत, दीपक भगत यांच्यासह अनेक भगत मंडळी परीश्रम घेत आहेत.


कॉपी करू नका.