वरणगावच्या मल्लाची खाशाबा जाधव राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड
वरणगाव : वरणगाव फॅक्टरीतील रहिवासी व हनुमान व्यायाम शाळेचा मल्ल व भुसावळच्या पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाचा तृतीय वर्ष सायन्स विभागाचा विद्यार्थी वैभव संजय मेढे (22) यांचे आळंदी येथे 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान होत असलेल्या ऑलम्पिक विजेता खाशाबा जाधव पाचव्या ग्रीकोरोमन, फ्री स्टाईल महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीनंतर वैभव मेढे यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पहेलवान स्व.सुखदेवराव निकम, पहेलवान नामदेव मोरे, पहेलवान कृष्णा निकम, पहेलवान सिद्धार्थ निकम, पहेलवान रमेश निकम, पहेलवान पांडुरंग निकम यांचा वैभव हा नातू आहे तर घरातूनच मार्गदर्शनाचे बाळकडू त्यास लाभत आले आहे. 92 किलो वजन गटात निवड होणारा वैभव हा जिल्ह्यातील एकमेव मल्ल ठरला आहे.