बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला


शिरपुरातील घटना : 19 ग्रॅम सोन्यासह 36 हजारांची रोकड लंपास

शिरपूर : शहरात बंद घराचे कुलूप व कडीकोंडा तोडून रोख रक्कमेसह हजारो रुपयांची सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवार, 22 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

बंद घराला चोरट्यांनी केले टार्गेट
शहरातील शिंगावे शिवारात मनोमंगल कार्यालयाच्या पाठीमागील ओमसाईराम रो-हाऊस येथे अज्ञात चोरांनी चोरी केली आहे. ओम साईराम रो हाऊस क्रमांक दोन या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे व गेटचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून साडे एकोणीस ग्राम सोने, दहाभार चांदीचे दागिने व 36 हजार रोख रक्कम चोरट्यांनी डल्ला मारला. घर मालक गुलाब निळे हे शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा येथील रहिवासी असून ते वाडी येथे आरोग्य सहाय्य आहेत. पुतण्याचे लग्न असल्याने ते आपल्या कुटुंबासह मुळगावी कमखेडा येथे गेले होते. 22 डिसेंबर रोजी सकाळी घरी आल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुलाब निळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !