गावठी कट्टे बाळगणार्‍या पंजाबमधील शस्त्र तस्करांची कोठडीत रवानगी


शिरपूर : सांगवी पोलिसांनी शस्त्र तस्कर सुखविंदरसिंह प्रकाशसिंह शीख (21 रा. बुलेरीयन, ता.मलोट, जि.मुखसर, पंजाब) लवदीपसिंह दलजितसिंह जाट (23 रा़ कोटईशिका ता.धरमकोट, जि.मोघा, पंजाब), दरजनसिंह बलविंदसिंह जाट (30, रा. गुरुतेग बहादर नगर, ता.फरिदकोट, पंजाब) यांना मंगळवारी अटक केली होती. आरोपींच्या ताब्यातून सहा जिवंत काडतुसांसह आठ गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले होते. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

शिरपूर तालुका पोलिसात दाखल होता
सांगवी सहा.निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतन तिघा शस्त्र तस्करांना मंगळवारी पहाटे सांगवी-वरला रस्त्यावरील जोयदा गावाजवळ पकडण्यात आले होते. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख रुपये किंमतीच्या आठ गावठी पिस्टल, एक हजार 200 रुपये किंमतीचे सहा जिवंत काडतूस, 15 हजारांची रोकड व 16 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल व तीन लाख रुपये किंमतीची चारचाकी (पी.बी.23 ए.एफ.4564) मिळून पाच लाख 32 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !