बोदवड तालुक्यात दहा कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन


बोदवड : बोदवड तालुक्यात दहा कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याहस्ते झाले. या कामांमध्ये आमदगाव येथे रस्ता काँक्रिटीकरण, सोनोटीत रस्ता काँक्रीटीकरण सभागृह, नांदगाव रस्त्याचे काँक्रिटीकरण, पालसखेड खुर्द सभागृह, वरखेड खुर्द रत्याचे काँक्रिटीकरण, चिंचखेडसीम रस्ता काँक्रीटीकरण, शिरसाळे सभागृह, हनुमान मंदिर पाण्याची टाकी, राजूर येथे रस्ता काँक्रीटीकरण व सभागृह यासह विविध कामांचा समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
बोदवड नगरपंचायत गटनेता कैलास चौधरी, कृउबा समिती संचालक रामदास पाटील, जळगाव दुधसंघ संचालक मधुकर राणे, हाजी सईद बागवान, दिनेश माळी, आनंद पाटील, विजेंद्र पाटील, जीवन राणे यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.