वीज तारांचा स्पर्श ; कुसुंब्यात म्हशी दगावल्या


कुसुंबा- कुसुंबा शिवारात तुटलेल्या वीज तारांना स्पर्श होवून पाच म्हशी दगावल्याची तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजता तालुक्यातील कुसुंबा शिवारात घडली. धनराज रामकृष्ण पाटील (60) या शेतकर्‍याकडे 40 म्हशी असून ते कुसुंबा शिवारात गुरे चराईसाठी गेल्यानंतर भास्कर शिवसिंग पाटील यांची शेताजवळ वीज खांबावरील तार तुटून जमिनीवर पडलेल्या वीजप्रवाह असलेल्या तारेला सहा म्हशींचा स्पर्श होवून पाच म्हशी दगावल्या तर एक गंभीर जखमी झाली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रतीलाल पवार व तलाठी वनराज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.


कॉपी करू नका.