भुसावळात वडेपाव विक्रेत्याला पाच हजारांचा दंड


भुसावळ- कॅरीबॅगला बंदी असलीतरी शहरात सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याने पालिकेच्या पथकाकडून अधून-मधून कारवाई सुरूच असून सोमवारीदेखील नाहाटा महाविद्यालयाजवळ वडा-पाव विक्री करणार्‍या गोपाळ अग्रवाल या विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणावर कॅरीबॅग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाव घेत कॅरीबॅगचा साठा जप्त करीत विक्रेत्यास पाच हजारांचा दंड केला.


कॉपी करू नका.