मेहरुणमधील तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना जन्मठेप


जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : एकाला संशयाचा फायदा देत निर्दोष सुटकाा

जळगाव : शहरातील मेहरुण येथील सोनू गोरखसिंग साळूंखे (20) वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणी सोमवार, 9 रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर एकाला संशयाचा फायदा देत त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. आरोपींनी एप्रिल 2018 मध्ये सोनूचा निर्घृण खून केला होता.

ग्लासात कमी दारू टाकल्यावरून उफाळला वाद
24 एप्रिल 2019 रोजी मयत सोनू गोरखसिंग साळूंखे, मच्छिंद्र तुकाराम नाथ (23), मोहन उर्फ प्यारेमोहन चंद्रकांत जाधव (19) व गुड्डू उर्फ कानशा वहाव शेख (22) हे चौघे जण शिरसोली नाकाजवळील हॉटेलवर मद्यप्रशान करण्यासाठी बसले होते. दरम्यान, सोनू याने गुड्डूच्या ग्लासात कमी दारु टाकली या कारणावरुन चौघांमध्ये वाद झाला होता. याबाबत सोनू याने त्याचा मित्र दीपक उर्फ बंडू प्रतापसिंग पाटील याला सांगितल्याने दीपक हॉटेलवर आला. यावेळी त्यांनी चौघांचा वाद मिटविला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मेहरुण तलाव परिसरात निर्मनुष्य ठिकाणी सोनूचा मृतदेह आढळला होाता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दीपक पाटील याच्यफिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला होता

दोघांना अखेर जन्मठेप
घटनेनंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित तपास सुरू करीत 24 रोजी दुपारी मच्छिंद्र, मोहन उर्फ प्यारेमोहन व गुड्डू हे गोपाळ देवीदास बटूंगे हे दोन दारुच्या बाटल्या घेवून मेहरुण तलावाकडे गेले होते, अशी माहिती जयसिंग भागवत पाटील यांक्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात गोपाळ बटूंगे, जयसिंग पाटील, जितेंद्र गायकवाड, डॉ. विजय कुरकुरे व तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक माधान पाटील यांच्यासह 11 साक्षिदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व परीस्थितीजन्य पुरावे लक्षात घेत न्या.पी.वाय. लाडेकर यांनी या प्रकरणी मोहन उर्फ प्यारेमोहन चंद्रकांत जाधव व गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख यांना जन्मठेप व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर मच्छिंद्र तुकाराम नाथ याला संशयाचा फायदा मिळत त्याची निर्दोष सुटका झाली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले.


कॉपी करू नका.